top of page

पुण्याची श्रद्धास्थाने : खुन्या मुरलीधर

Writer's picture: Ranjit GhatgeRanjit Ghatge

Updated: Jun 29, 2020



सदाशिव पेठेतील अनेक देवळामधलं हे एक महत्वाचं देऊळ आहे.

मूळ देऊळ दादा गद्रे या धनाड्य सावकारांचे. पेशवाई मधले एक मोठे प्रस्थ. गद्रे सावकारांचा वाडा अहिल्या देवी हाय स्कूल च्या जागी होता.


एक चांगलं कृष्णाचे मंदिर बांधण्यासाठी त्यांनी त्या काळच्या ख्यातनाम राजस्थानी मूर्तिकार बखतरामला पाचारण केले आणि आजच्या त्या मूर्तींची निर्मिती झाली. त्या काळी बखत राम ला १०,००० रुपये दिल्याचे सांगतात.


या सुंदर मूर्तींवर बाजीरावाचे मन जडले आणि त्यांनी त्या मूर्तींची गद्र्यांकडे मागणी केली.

गद्र्यांनी घाई घाई ने प्राण प्रतिष्ठा करून घेतली .ते साल होते मे १७९७. गद्र्यांचा हा नकार त्यांना चांगलाच महागात पडला. त्यांची सर्व संपत्ती जप्त केली गेली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.

मधल्या काळात त्या रस्त्याने कॅ . बॉईड ची एक पलटण त्या रस्त्या वरून जात असताना दादांच्या पदरी असलेल्या काही अरबी सैनिकांनी त्याला अटकाव केला . बाचाबाची वरून गोष्ट हमरी तुमरी वर आली. शस्त्रे बाहेर निघाली आणि बंदुकीच्या फैरी झडल्या . आणि बरीच माणसे कमी आली .

या रक्तरंजित घटनेवरून देवाचे नाव रूढ झाले - खुन्या मुरलीधर.



गद्र्यांच्या अटके नंतर त्रयम्बकेश्वच्या नारायण भट्ट खर्यांनी देवालयाची व्यवस्था आणी पूजा अर्चा भाविकपणाने केली . पुढे पेशवाई संपल्यावर दादा गद्र्यांची सुटका केली. पण झाल्या सर्व प्रकरणा मुळे गद्र्यांना विरक्ती आली होती. खर्याना त्यांनी देवालय मालकी हक्काने देऊन , त्र्यंबकेश्वरला सन्यास घेऊन उर्वरित आयुष्य व्यतीत केले.



एके काळी पेशव्यांना कर्ज देणाऱ्या धनाढय गद्रे सावकारांना नशिबाचे भोग अशा तर्हेने भोगावे लागले .

सुमारे शंभर वर्ष नंतर याच चौकात रॅंड आयर्स्ट खून खटल्यातल्या चुगलखोर द्रविड बंधूंना चाफेकर आणि रानडे यांनी ठार मारले, पण या घटनेचा देवळाच्या नावाशी काही संबंध नसावा.

मुरलीधर मंदिराचा "खुन्या मुरलीधर "असे नामकरण होण्याचा हा इतिहास




संदर्भ :- म .श्री. दीक्षित , ना.वि. जोशी यांच्या पुस्तकां च्या आधारे

95 views0 comments

Comments


Subscribe Form

9822047304

  • Facebook

©2020 by Pune Memories. Proudly created with Wix.com

bottom of page