top of page

प्रभातचे बोध चिन्ह

Writer's picture: Ranjit GhatgeRanjit Ghatge

प्रत्येक फिल्म कंपनीचे स्वतःचे एक बोध चिन्ह असते. हे बोध चिन्ह चित्र किंवा चलत चिन्ह पण असते, फिल्मच्या सुरवातीला आणि शेवटाला हे चिन्ह दाखवितात . पूर्वीच्या जेमिनी फिल्म्स ची तुतारीवाली दोन मूले , राजकमलची उमलत्या कमळातून उभी राहून दोन्ही हातानी पुष्पांजलीं देणारी तरुणी ,आर. के . स्टुडिओस चा एका हातात व्हायोलिन व एका हातात वाकलेल्या तरुणीला आधार देणारा पुरुष आणि पाठीशी इंग्रजीतली आर.के . अशी अक्षरे. इंग्रजी सिनेमातली paramount च्या बोध चिन्हात बर्फाच्छादित शिखरे आणि त्या भोवतालचे ताऱ्यांचे गोल वलय . मेट्रो गोल्डवीन मेयर्स चा डरकाळी फोडणारा सिंह .कोलंबिया फिल्म्स ची हातात मशाल घेतलेली ग्रीक देवतेसारखी तरुणी .



एक ना अनेक बोध चिन्हे किंवा लोगोज. यात प्रभात चित्रपटांचे चलत बोध चिन्ह आकर्षक होते.

सूर्याच्या तेजस्वी किरणांच्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगातील तरुणीचे चिन्ह त्या काळी आकर्षण ठरले होते .ही स्त्री मागे झुकून हातातली तुतारी फुंकीत असे. तिच्या लांब वेणीचा शेपटा खाली लोम्बत असे मागच्या पार्श्वभूमीच्या तिच्या पाया पाशी प्रसादाची अथवा मंदिराची गोपुरे दिसत.


या बोध चिन्हांमध्ये प्रभात फिल्म्स अशी अक्षरे नव्हती असे अंधुकसे स्मरते. प्रभातच्या १९२९ ते १९३३ पर्यंत हे बोध चिन्ह निराळे होते असे वाटते. या काळात बाबुराव पैंटरांच्या मार्गदर्शन खाली स्टुडिओ कोल्हापूरात होता. १९३३ ला पुण्यात स्थलांतरित झाल्यावर धायबर , दामले, फत्तेलाल , आणि व्ही . शांताराम यांच्या भागीदारीत स्टुडिओ पुण्याला स्थलांतरित झाला .


त्या काळातले बोधचीही तुतारी वाल्या तरुणीचे रवीकिरणांच्या पार्श्वभूमीवाले चलत चिन्ह रूढ झाले असावे असे वाटते. हे तुतारीवली कमनीय तरुणी कोण होती हे बराच काळ शोधल्यावर सापडले .

गुलाब बाई उर्फ कमला देवी नावाची ही तरुणी १९३० सालच्या सैरंध्री. या मूकपटाची नायिका होती . तिने सैरंध्रीचे काम केले होते. हीच कमलादेवी बोधचिन्हातली तुतारी फुंकणारी चारुगात्री होती .

या कमला देवींचे पुढे फत्तेलाल या प्रभातच्या एका भागीदाराशी लग्न झाले.

डॉ .आर .के .वर्मा यांनी लिहिलेल्या सायलेंट सिनेमा नावाच्या पुस्तकात तसा उल्लेख आहे.


तर , अशी हि एका बोध चिन्हाची छोटीशी चित्रकथा !!!

116 views0 comments

Comments


Subscribe Form

9822047304

  • Facebook

©2020 by Pune Memories. Proudly created with Wix.com

bottom of page