top of page
Writer's pictureRanjit Ghatge

टिळक रोड - धूसर आठवणी

Updated: Jun 11, 2020


टिळक रोड - पुण्यातील एक महत्वाचा रस्ता ,लकडी पूल पोलीस चौकीपासून थेट स्वार गेट चौक पर्यंत दोन चार पेठांना कवेत घेऊन जाणारा हा रस्ता पुण्याच्या सांस्कृतिक , शैक्षणिक, सामाजिक. अशा अनेक वास्तूना प्रेमाने सांध्यात जाणारा रस्ता.

टिळक रस्त्याची सुरवात लकडी पुलापापासून करू.

येथील डोक्यावर एक आणि कमरेवर ओसंडत्या घागरी घेऊन ओलेत्या चारुगात्रीचे हे लोभस स्वरूप कित्येक दशके पुणेकरांना मोहवीत होते

चौकात इराण्याचे मोठे रीगल रेस्टोरेंट - बन मस्का , ऑम्लेट , क्रीम रोल्स आणि काही डिशेस - बरोबर सीक्रेट फॉर्मूलाचा कडक चहा आणि पुण्यात क्वचित दिसणारी जूक बॉक्स

या यंत्रात आठ पाण्याचे एक नाणे टाकून बटण दाबले कि आपोआप आपल्याला पाहिजे त्या गाण्याची तबकडी अलगद येऊन गाणे सुरु व्हायचे . तासन तास दोन कप चहा, सिगारेटी आणि गाण्यांचा आस्वाद घेत मंडळी बसत.

कोपऱ्यात धारपांचे " अलका टॉकिज ". बहुदा इंग्लिश चित्रपट दाखवत .

समोर आपटे मोटर ड्रायविंग स्कूल , याच्या समोर कोण्या खान साहेबाचा संगीत क्लास होता वाद्य वादनाचा पांजरपोळ संस्था , डॉ. पंत आणि कुसुम पंत या प्रथित यश डॉक्टर दाम्पत्याची कन्स्लटिंग रूम पुढे वाय व्ही फाटकांचे मोठे हॉस्पिटल - समोर सुधीर फडक्यांचे "चित्रकुटी " याच बिल्डिंग मध्ये बेहेरे प्रकाशनचे आणि काही काळ ग्राहक पेठेचे ऑफिस होते खाली हॉलवर्ड इंजिनिर्स चे कार्यालय आणि लागून शिंदे स्पोर्ट्स पुढे भले मोठे न्यू इंग्लिश स्कूल . टिळक , आगरकर चिपळूणकर , नामजोशी यांनी स्थापन केलेल्या शाळेत माझे ४ वर्ष शिक्षण झाले

भव्य पटांगण , मोठा डोम असलेले - कुसुमबाई प्लॅनेटेरियम - पुण्यातले एक मेव तारांगण दर्शन केंद्र.

उजव्या बाजूला अशोक स्कूल. शाळे समोर पंतांचा गोट होता , येथे ग.दि. मांचे येऊन जाऊन वास्तव्य असे . बहुधा त्यांचे कोणी अतिशय जवळचे मित्र राहत असावेत.

याच्या पुढची दिग्गज वास्तू म्हणजे " मराठी साहित्य परिषद " - लेखक वाचकांची पंढऱी .येथून टिळक रस्त्याला फाटा फुटून नव्या पेठेची जवळीक सुरु होते.


मानकरांच्या दुर्वांकूरच्या शेजारी "विशाल सह्याद्री". या वृत्तपत्राचा कारखाना होता ( मुद्रणालय) थोडे पुढे गेल्यावर छोटेखानी पण भजी आणि वडे यासाठी प्रसिद्ध " रामनाथ " होते पहिल्या घासाला जिभेची बोबडी वळवणारी तिखट भजी लोक हुळहुळत्या जिभेने खात बसण्याला जागा जवळ जवळ नव्हतीच.


तिथून पुढे पाटील भाजीवाल्या च्या चौकातुन एक रस्ता चिमण बागेकडे जात असे पुढे फक्त स्त्रीयांचे कपडे शिवणार्या - केशरताई पाटीलांचे दुका होते . त्या काळात फक्त स्त्रियांचे कपडे शिवणाऱ्या आणि स्त्री संचालित असे कदाचित एक मेव दुकान असेल

महाराष्ट्र मंडळाला लागून बिस्कीट वाल्या साठ्यांचे घर असल्याचे अंधुकसे स्मरते महाराष्ट्र व्यायाम मंडळ ची नवीन वस्तू होण्यापूर्वी - नुसते एक गेट होते शिवरामपंत, भालूकाका,रमेश अशा २- ३ पिढ्यांची हि. संस्था पूर्ण शारीरिक संवर्धनाला वाहून घेतलेली पुण्यातली अग्रगण्य संस्था होती मी बरेच वर्ष वझे सरांच्या संघात होतो महाराष्ट्र आनंदाला समोर " "वनिता समाज "चा बॅडमिंटन हॉल होता. मंडळाला लागून " किशोर फ्लोर मिल " ची मसाले दळून देणारी गिरणी होती त्याचा दरवळ सर्व परिसरात पसरलेला असे

पुढे माझा मित्र श्रीरंग फडके चा मोठे आवार असलेला बंगला होता. पुढे आनंद पुस्तक मंदिर , प्रफुल्ल मेडिकल्स ( अगरवालांचे ) करत आपण बादशाही हॉटेल चौकात पोचतो. बादशाही उपवासाची बटाटा आवरण वेष्टित गोड ओल्या खोबऱ्याच्या किसाची कचोरी फारच प्रसिद्ध आणि रुचकर असे . शिवाय मासिक मेस चे विद्यार्थी त्यांचे नेहेमीचे गिर्हाईक असत.


बादशाहीच्या चौकात " कमल पान " चे दुकान होते . त्याच्या शेजारी अलका talkies चे धारप राहत त्याच्या समोरची वस्तू म्हणजे टिळक स्मारक मंदिर. वसंत व्याख्यान माला ,मराठी नाटके , गुलाब पुष्प प्रदर्शने ,अनेक तऱ्हेची हस्तकला प्रदर्शने , असे बरेच काही कार्यक्रम, संमेलने , सत्कार समारंभ वगैरे या ठिकाणी होत असत . टिळकांच्या केसरी वृत्तपत्राची जुनी छापखाना यंत्रे या ठिकाणी ठेवली आहेत त्याच्या शेजारी गॅस सिलेंडरचे गोदाम होते ता. रा . देसाई यांची esso ची एजेन्सी होती .

त्याच्या दर्शनी भागाच्या बिल्डिंग च्या दुसऱ्या मजल्यावर फॅमिली कोर्ट किंवा तत्सम दिवाणी न्यायालय होते . या बिल्डिंग मध्ये मात्र सदाशिव पेठी संस्कृतीला छेद देणारी दोन दुकाने काही काळ होती त्या पैकी एक मोठे wine शॉप होते आणि दुसरे म्हणजे दुर्गाचे बिर्याणी हौस रुद्राक्ष संस्कृतीवर पोसलेली ही पेठ , द्राक्ष संस्कृतीला (wine शॉप) ला पण सांभाळत होती . सदाशिव पेठ च्या प्रशस्त पोस्ट ऑफिस ला लागून स.प. महाविद्यालयाची २५ एकरा मधील हे टोलेजंग महाविद्यालयाला शतकोत्तर काळाचा वारसा आहे . टिळकांच्या शब्दाला मान देऊन जगन्नाथ पंडितांनीं हि जागा कराराने संस्थेला दिली . टिळक, न. चीं केळकर, नामजोशींच्या पाठिंब्याने उभी राहिलेली शिक्षण प्रसारक मंडळींची हे वस्तू पुण्याचे भूषण आहे , साने गुरुजी आणि बाबुराव पारख्यांसारखी उत्तुंग व्यक्तिमत्व येथेच घडली. नु .म . वि याच संस्थेची शाळा. जमखंडीच्या पटवर्धन राजघराण्याने दिलेल्या देणगी नंतर याचे सर परशुरामभाऊ पटवर्धन असे नाव झाले . माझे दोन वर्षाचे शिक्षण येथेच झाले. आमच्या वेळा प्राध्यापक मालेगावकर सर होते.


पुढच्या टप्प्यात जेथ ग्राहक पेठ आहे तिथे जीवन restaurant होते . सर्व सामान्य माणसांचे एक तारखेला पगार झाल्यावर कुटुंबासहित जाण्याचे ठिकाण . शेजारच्या उरसळ बिल्डिंगमध्ये जेष्ठ नेते शंकर राव उरसळ राहायचे. पुढे वाघोलीकर यांचे किराणा दुकान . त्याच्या समोर लोखंडे प्रकाशन . येथे आतल्या बाजूला पुण्यातले पहिले डिपार्टमेंटल स्टोर पारिजात होते . ट्रॉली घेऊन रॅक वरचे सामान घेण्याची सोय होती.आजच्या सीलाईच्या च्या दुकानाच्या जागी. Borana चे मोठे stationery स्टोर होते तिथे architecture व engineering ला लागणारे मोठे sheets , टी square , मिनी drafter असे सामान मिळत असे . अभिनव कला विद्यालय च्या विद्यार्थ्यांच्या साठी हे खास दुकान होते. अभिनव कला महाविद्यालय हे पुण्यातील वास्तुस्थापात्यशास्त्र शिकवणारे पहिलेच विद्यालय होते. स्वतः प्रिन्सिपॉल डेंगळे सर हे उत्कृष्ठ चित्रकार सुद्धा होते.

वाटेत डाव्या हाताला चौकात musical instruments चे मोठे विक्रेते मेहेंदळ्यांचे घर होते.

टाटा ट्रक्स buses ची agency पंडितांकडे होती . ऑटोमोटिव्ह सर्विसेस नावाने तिथे मोठा वर्क शॉप होता.

मागल्या भोगिलाल chemist च्या चौकातली कल्पना भेळ अतिशय प्रसिद्ध होती. त्या रांगेत पोरवाल टूथ पावडर चा डेपो होता, त्या मूळे तिथे निलगिरीचा दरवळ यायचा .


(मागच्या भागात अलका Talkies जवळच्या Ram agency चा उल्लेख करायचा राहिला त्याचे मालक भागवत यांच्याकडे Fiat आणि नंतर प्रीमियर पद्मिनीची agency होती )

अप्सरा हॉटेलपासून शुक्रवार पेठ सुरु होत असावी ह्या हॉटेल मध्ये बार व नॉन veg वाल्यांची मोठी वर्दळ असे. त्याच्या पुढचे म्हस्के स्मारक मंदिर आणि नेहरू स्टेडियम हे टिळक रोडचे शेवटचे मोठे मान बिंदू . यापुढे प्रसिद्ध लेखक ग.ल. ठोकळ यांचा कोंदण बंगला होता. असा हा टिळक रोड पुण्याचा महत्वाचा कला, क्रीडा, साहित्य, यांचा मोठा राजपथ !!!!!!




125 views0 comments

Comments


bottom of page